सायबर अवेअरनेस संदर्भात बैठक संपन्न

Views: 412
शेअर करा:

कल्याण : कल्याण पूर्वेतील साकेत महाविद्यालयाच्या कान्फरेन्स हॉलमध्ये कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांची सायबर अवेरनेस आणि बालकांसंदर्भात होणारी सयक़्बर गुन्हे शाळेची सुरक्षितता या विषयावर गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये ‘सायबर अवेअरनेस’ बाबत सायबर गुन्ह्यांची माहिती देऊन सदरचे गुन्हे रोखण्यासाठी पत्रके वाटुन जनजागृती करण्यात आली. 

तसेच उपस्थितांना ‘१ कॅमेरा देशासाठी व समाजासाठी’ या उपक्रमाची माहिती देऊन होणारे गुन्हे रोखण्यासाठी व शाळेच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेराचे महत्व समजावून सांगण्यात आले. आपल्या शाळा, महाविद्यालयाच्या आत व बाहेर रस्त्याच्या दिशेने सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी आवाहन करण्यात आले. या बैठकीस सहा. पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, यांच्यासह सायबर व्याख्यानकर्ते उमाकांत चौधरी (अध्यक्ष, स्टडी वेव्हज एनजीओ कल्याण पुर्व) यांनी उपस्थितांना मार्गार्दर्शन केले. यावेळी कल्याण पूर्वेतील शाळा, महाविद्यालयातील सुमारे ४५ शिक्षक उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत