एलिट लीगा आट्यापाट्या २०२२ स्पर्धेत नॉर्थर्न बिअर्स संघ विजयी

Views: 495
शेअर करा:

कल्याण : महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन यांच्या सहकार्याने आरंभ स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून एलिट लिगा आट्यापाट्या २०२२ (पर्व पहिले) या दोन दिवसीय स्पर्धेचे नूतन विद्यालय येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंनी खेळाडूंसाठी बनवलेली हि संस्था असून खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव मिळावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

  या स्पर्धेच्या समारोप सोहळ्यासाठी अभिनेते अमित परब, संघमालक प्रतिक थोरात (फ्लिक्सएरा 4K वॉलपेपर अँप), हकीमुद्दीन वाडलावाला (प्रोटेक्मानाईझ सोलुशन्स पायव्हेट लिमिटेड), विजय सपालिगा (फॉरेक्स स्कॅल्पर विजय) आणि हिमांशू सिंग (सिटेक्स इंडस्ट्रिज आणि एक्स्पोर्टस्), संघ प्रशिक्षक अनिल माकडे, शरद गव्हार, सौरभ मोहोड, सागर गुल्हाने तसेच माजी आमदार नरेंद्र पवार, सुरेश संगोई, गणेश पानसरे, गिरीश पाटील, एलिट लिगा आट्यापाट्या स्पर्धेचे संस्थापक अक्षय बक्कम, अध्यक्ष ओंकार सुर्वे तसेच आरंभ स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष रोशन सकपाळ, सचिव देवकी कोकाटे, सदस्य सोहम चव्हाण आणि विजय बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यातून एकूण ४८ खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर कौतुकास्पद कामगिरी केली. या स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या साऊथ स्कॅल्पर्स या संघावर अंतिम सामन्यात सरळ दोन सेट मध्ये विजय मिळवत नॉर्थर्न बिअर्स या संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकविले. तर वेस्टर्न टायटन्स आणि ईस्ट ईगल्स या दोन संघाना तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत स्वप्निल महाजन (साऊथ स्कॅल्पर्स) याने मालिकावीर पुरस्कार पटकवला. तसेच दुर्गेश घुमरे (साऊथ स्कॅल्पर्स) उत्कृष्ट संरक्षक, अजिंक्य ढोले (वेस्टर्न टायटन्स) उत्कृष्ट आक्रमक, आदित्य नागरिकर (नॉर्थर्न बिअर्स) उत्कृष्ट सुर ठरले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवछत्रपती पुरस्कार विजेते मार्गदर्शक अंकुर आहेर यांनी केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत