अनधिकृत बांधकामाला विरोध केल्याने शेजाऱ्याने केली मारहाण

Views: 381
शेअर करा:

कल्याण : घराच्या अनधिकृत बांधकामाला विरोध केल्याचा राग मनात ठेवून शेजाऱ्याने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील बारावे गावात घडली आहे. घराच्या बांधकामावरून दोन शेजाऱ्यामध्ये हा वाद झाला असून एका शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्याच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला केला आहे. हि घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून विशेष मिरकुटे नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी महेंद्र देसाईकर सह आणखी तीन हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  कल्याण पश्चिमेतील बारावे गावात विशेष मिरकुटे हा ३२ वर्षीय इसम आपल्या कुटुंबियांसमवेत राहतो. त्यांच्या शेजारी राहत असलेल्या महेंद्र देसाईकर याने आपल्या घराचे बांधकाम सुरु केले असून वाढीव बांधकाम केल्याने मिरकुटे यांना कोणतीही पायवाट अथवा मोकळी जागा न सोडल्याने त्यांनी विरोध केला होता. हा राग मनात ठेवून देसाईकर याने रविवारी रात्री मिरकुटे यांच्या घरात घुसून धारदार लोखंडी शस्त्राने डोक्यावर जीवेघेणा हल्ला केला. या हल्ल्यामुळे विशेष मिरकुटे यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागल्याने त्यांनी लागलीच खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. यावेळी देसाईकर याने विशेष यांच्या आई आणि पत्नीला देखील मारहाण केली.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने विशेष मिरकुटे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरु असून याप्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये महेंद्र देसाईकर सह अन्य तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद झिने करीत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत