Views: 523
कल्याण : जीवनदीप महाविद्यालयातील इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त ‘शिव व्याख्याना’चे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी व्याख्याते प्रा. भगवान विशे यांनी शिवरायांच्या कार्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. देशातील विविध समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी तरुणांनी शिवरायांचा आदर्श घेऊन काम केले पाहिजे. तसेच देशातील अनेक समस्यांवर फक्त मते व्यक्त न करता आपल्या कृतीतून कार्य दाखविले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
त्यांनी देशातील भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, पाणी प्रश्न, राजकारण आदी विषयांवर शिवकालीन संदर्भ देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कविता काटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, प्रा.डॉ. दौलतराव कांबळे, प्रा.जया देशमुख तसेच मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


