Views: 436
कल्याण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक ९७, ९८, १०१ व १०२ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरप्रमुख शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १६ एप्रिल २०२३ रोजी कल्याण पूर्वमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ, काटेमानिवली नाका, कल्याण पूर्व येथून करण्यात आला.
यावेळी कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहीमेचा प्रारंभ काटेमानिवली नाका येथून करण्यात येउन या मोहीमे अंतर्गत हनुमान नगर मुख्य रस्ता ते कैलाश नगर चौक पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुची साफसफाई करण्यात आली. या स्वच्छता मोहीमेत महिला आघाडीच्या महिला शहर संघटक मिना माळवे, युवासेना जिल्हा समन्वयक संतोष सावंत, युवासेना शहर अधिकारी अॅड. नीरज कुमार, उपशहर अधिकारी अशोक पाखरे, उपशहर संघटक साधना पार्टे, सविता बळे उपशहर प्रमुख हेमंत चौधरी, प्रकाश जाधव, उपशहर संघटक रवींद्र उत्तेकर विभाग प्रमुख संजय गुजर, उपविभाग प्रमुख भिकाजी मोरे, अशोक पडांगळे, प्रसाद अडूरकर, महिला उपविभाग संघटक आश्लेषा पवार, योगिता गुजर, शाखा प्रमुख दत्ताराम नार्वेकर, शशिकांत गायकर, प्रतिक राय, महिला शाखा संघटक अमृता कदम, कल्याण पूर्व आयटी सेल प्रमुख पंकज पांडेय, कमलेश पार्टे, मीनाक्षी आहेर यांच्या सोबत शिवसेना पदाधिकारी, युवा सैनिक, अहिला आघाडी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर अभियान काटेमानिवली चौक ते कैलाश नगर मुख्य रस्ता येथे राबविण्यात आले. अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योग्य त्या समन्वयाकरीता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली होती. सदर मोहिमेअंतर्गत रस्ते सफाई, परिसर सफाई, रस्त्यालगत असलेले डेब्रीज इ. साहित्य उचलणे इ. बाबत कार्यवाही करण्यात आली असून, याकरीता महापालिकेकडून वाहन उपलब्ध करुन देण्यात आले होते.


