Views: 366
कल्याण : कल्याण पूर्वेतील गणेश विघालयात शुक्रवारी शालेय मुलींसाठी “वयात येताना” या विषयावर महाराष्ट्र अंनिस कल्याण शाखेतर्फे मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमाला सुमारे २०० शालेय मुलींची उपस्थिती होती. संवादक कल्याण शाखेच्या कार्याध्यक्षा डॉ सुषमा बसवंत यांनी विद्यार्थ्यांना फळ्यावर चित्र काढून व मौखिक मार्गदर्शन करून मानवी शरीर व वयात आल्यावर मुले व मुली यांच्यामध्ये कोणते शारीरिक व मानसिक बदल होतात, हे सविस्तर पटवून सांगितले.
यावेळी शाखेचे सभासद प्रधान सचिव अँड. आरती चकोले हाटकर, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह प्रज्ञा चव्हाण, महिला सहभाग कार्यवाह मंगल मोरे, ज्योती मेश्राम आदी उपस्थित होते. शेवटी प्रश्नोत्तरे व शंका समाधान घेण्यात आले. मुख्याध्यापिका शेणवी यांनी असे कार्यक्रम काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. शलाका शेटे यांचे चांगले सहकार्य लाभले. शेवटी विद्यार्थिनीने आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.



