Views: 713
कल्याण : के. व्ही. पेंढरकर कॉलेज अनुदानित असताना ते विनाअनुदानित करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. याप्रकरणी सेव्ह पेंढरकर कॉलेज मोहिमेचे आयोजक सोनू सुरवसे यांनी गुरुवारी उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देऊ कॉलेजवर प्रशासक नेमण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी सुरवसे यांच्यासोबत कॉलेज कर्मचारी प्रतिनिधी प्रशांत भोईर, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे उपस्थित होते.
उच्च तंत्र शिक्षणमंत्री पाटील यांच्यासह सुरवसे यांच्या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधि मंडळाचे नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे नेते भाई जगताप, आमदार सतेज पाटील, किसन कथोरे यांची भेट घेतली. दरम्यान, कॉलेजवर प्रशासक नेमण्यात यावा, ही मागणी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधान परिषदेत केली आहे.


