Views: 345कल्याण : क्रिकेटची टीम होती, कबड्डीची टीम झाली शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सचिन पोटे यांचा शिवसेना उबाठा गटाच्या गटनेत्यांना टोला लागवला महापौर आणि उपमहापौर पद निवडीच्या महासभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमधील टोलवा टोलवी दिसून आली.
हुशार, अभ्यासू आणि आपल्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध असणारे शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटे यांनी शिवसेना उबाठाचे गटनेते यांना जोरदार टोला लगावला. “तुम्ही निवडून आले तेव्हा क्रिकेटची टीम होती, मात्र इकडे सभागृहात येईपर्यंत ती कबड्डीची झाली” या शब्दांत सचिन पोटे यांनी शाब्दिक कोडी केल्याची महासभेच्या दरम्यान पाहायला मिळाली.



