आंतर महाविद्यालयीन खो-खो महिला स्पर्धेत एसएसटी महाविद्यालय द्वितीय स्थानावर

Views: 685
शेअर करा:

कल्याण : मुंबई विद्यापीठ ठाणे विभाग आणि केबीपी महाविद्यालय वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेत एसएसटी महाविद्यालयातील महिला खेळाडूंनी द्वितीय स्थान पटकावले आणि ५ खेळाडूंनी विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

त्यात अनुक्रमे मनोरमा शर्मा, रेश्मा राठोड, अश्विनी मोरे, वृतिका सोनवणे आणि किशोरी मोकाशी यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत एकूण १५ महाविद्यालयातील १५० च्या वर खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. आंतर विभागीय स्पर्धा डॉ. आंबेडकर महाविद्यालय वडाळा येथे होणार आहेत.

एसएसटी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.पुरस्वानी, आयक्यूएसी को ओर्डीनेटर डॉ. खुशबू पुरस्वानी, उपप्राचार्य जीवन विचारे, उपप्राचार्य प्रा दीपक गवादे, प्रा. तुषार वाकसे तसेच क्रीड़ा संचालक राहुल अकुल, पुष्कर पवार, मार्गदर्शक नरेंद्र मेंगल आणि प्रताप शेलार, सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी यां सर्वांनी सर्व खेळाडूंचे  अभिनंदन केले आणि मुंबई विद्यापीठ आंतर विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत