Views: 485
कल्याण : श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ कल्याण या शैक्षणिक संस्थेतर्फे ठाणे जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकास शिक्षक भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे अशा व्यक्तींनी आपली फाईल २० ऑक्टोबर २०२२ पर्यंत श्री गजानन विद्यालय शिवाजी चौक, आग्रा रोड, कल्याण (पश्चिम) जिल्हा ठाणे – ४२१३०१ या पत्त्यावर पाठवावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.



