Views: 527
लवकरात लवकर कचरा उचलण्याची आई एकविरा महिला मंडळाची मागणी
कल्याण : कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून केडीएमसी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या कचऱ्याच्या ढिगांमुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती असून येथील कचरा उचलण्याच्या मागणीसाठी आई एकविरा महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सोनी क्षीरसागर, समाजसेवक संदीप क्षीरसागर व महिला पदाधिकारी यांनी केडीएमसी उपायुक्त अतुल पाटील यांची प्रत्यक्षात भेट घेतली. यावेळी लवकरच आडीवली परिसरातील कचरा उचलण्याचे आश्वासन उपायुक्त पाटील यांनी दिले.
पावसाळा तोंडावर असून अशातच कल्याण पूर्वेतील आडिवली राजाराम पाटील नगर या परीसरात “भुमी प्लाझा सोसायटी” येथे शेजारी मोठ्या प्रमाणत कचरा पसरला असून त्यामुळे परीसरात मोठ्या प्रमाणात उग्रवास व दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे परीसरात मोठ्या प्रमाण लहान मुले, महिला व नागरीक मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. यासाठी लवकरात लवकर या कचऱ्याची व्हिलेवाट लावण्यात यावी व नागरीकांना उग्रवास व दुर्गंधी पासून लवकरात लवकर मुक्त करण्याची मागणी आई एकविरा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.


