Views: 482
कल्याण : कमी वेळात जास्त लोकाभिमुख काम महायुती सरकारने केले असल्याचे मत शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केला आहे. महायुती सरकारच्या यशस्वी कार्याची ओळख करून देण्यासाठी आणि नागरिकांशी जोडण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून कल्याण ग्रामीण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने केलेल्या प्रगतीची आणि राज्याच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या महत्वपूर्ण योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी गोपाळ लांडगे बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, कल्याण लोकसभा प्रमुख शशिकांत कांबळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, शिवसेना महिला जिल्हा संघटक विजया पोटे, डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण, गुलाब वझे, उपशहर प्रमुख गोरखनाथ म्हात्रे, सागर जेधे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या विकास कामांवर बोलताना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी कल्याण लोकसभा क्षेत्रात गेल्या दहा वर्षात काया पालट झालाय. लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काही सोयी सुविधा कमी पडतात मात्र त्या कमी पडू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न चालू आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये किंवा दहा वर्षांपूर्वीच्या अवस्था होती त्याच्या कितीतरी पटीने हा विभाग निश्चितपणे सुधारला असल्याची माहिती गोपाळ लांडगे यांनी दिली.



