राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वनवासी संवाद कडून वनवासी भगिनींना साडी व मिठाईचे वाटप वनवासी संवादचा १७०० भगिनींशी संवाद

Views: 545
शेअर करा:

कल्याण : दिवाळीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वनवासी संवाद ने आयोजित केलेल्या वनवासी भगिनींना साडी व मिठाईचे वाटप माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याहस्ते करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आत्माराम (बाबा) जोशी यांनी १५ वर्षांपासून सुरू केलेल्या या उपक्रमात धसई,  मुरबाड जवळील वनवासी पाड्यात २३० वनवासी भगिनींना साडी व मिठाई भेट देण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे भाऊबीजेनिमित्त १ साडी व मिठाईचा पुडा देण्याचा उपक्रम याही वर्षी वनवासी संवाद ने आयोजित केला होता. वीस गावातील जवळपास १७००  भगिनी याचा लाभ घेणार असून त्यांच्या कुटुंबियांशी संवाद केला जाणार आहे.  यंदा या उपक्रमाची सुरुवात धसई जवळील वनवासी पाड्यात करण्यात आली. या उपक्रमाला यंदा जैन अलर्ट ग्रुप कल्याण, दि कल्याण जनता सहकारी बँक कर्मचारी संघ कल्याण, श्री सद्गुरू एज्युकेशन वेल्फेअर ट्रस्ट मुंबई, भारत विकास परिषद कल्याण शाखा तसेच चव्हाण फाउंडेशन कल्याण यांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल घरत,वैभव गुडे,सतिश शिंगोळे,निलेश रेवगडे तसेच छत्रपती शिक्षण संस्थेच्या जनता विद्यालयातील ठाकूर देसाई ,जगदीश फोगेटे, झावरे व शिंदे तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पुढील आठवड्यात शहापुर तालुक्यातील लाखाची वाडी, मधली वाडी, रानवीर, जांबुळ वाढ निभळपाडा. कामतबाडी, खोकरे वाडी, पाचघर, चाफ्याची वाडी, भिवंडी तालुक्यातील देवराई, देवचोळे, सागाव, कसारा जवळील तीन वाडया आदी ठिकाणीही वनवासी भगिनींना साडी व मिठाई वाटण्यात येणार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत