शिवसेना उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडेंवर प्राणघातक हल्ला

Views: 394
शेअर करा:

कल्याण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थक आणि शिवसेना कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर बुधवारी सकाळी कामावर जात असताना प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कल्याण पूर्वेतील पुणा लिंक रोड येथे घडली आहे. पालांडे यांच्यावर खाजगी रुगनालयात उपचार सुरु आहे. या हल्ल्याच्यामागे माजी नगरसेवक महेश गायकवाड हे असल्याचा आरोप हर्षवर्धन पालांडे यांनी केला आहे. या आरोपाबाबत् माजी नगरसेवक महेश गायकवाड याना विचारले असता हा आरोप फेटाळत, या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. या घटनेत जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे गायकवाड यांनी सांगितले.

बुधवारी सकाळी उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे काही कामानिमित्त आपल्या गाडीने जात असताना तीन ते चार अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. पालांडे यांचा आरोप आहे की, हल्लेखोर यांच्या हातात लोखंडी रॉड आणि तलवार असे धारदार शस्त्र होते. ‘शिवसेनेत तू जास्त उडतोय’ असे सांगत हल्लेखोराने पालांडे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पालांडे जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. कल्याणच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळतात कल्याण आणि उल्हासनगर मधील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये जमा झाले. पालांडे यांचा आरोप आहे की, या हल्ल्यामागे शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचा हात असून त्यांच्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला आहे. पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.   

तर याबाबत महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. मी एक समाजप्रिय कार्यकर्ता आहे. त्यामुळे अशा घटनांना मी पाठिंबा देत नसल्याचे त्यांनी सांगितले.

विचारपुससाठी उद्धव ठाकरे यांचा कॉल      

  हर्षवर्धन पालांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालांडे यांना विचारपूससाठी कॉल केला होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी हर्षवर्धन पालांडे यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. तसेच सध्या तुम्ही आराम करा, आपण लवकरच कल्याणात येणार असून या हल्ल्याचा माहिती घेऊ असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत