कल्याण पूर्वेत श्री शिव संस्कार महोत्सवाला प्रारंभ…

Views: 405
शेअर करा:

४ बाय ४० फुट जय शिवराय आकाराच्या पुस्तक मांडणीत पुस्तके दान करण्याचे आवाहनया उपक्रमाची नोंद इंडिया बुक रेकॉड्स आणि अनेक रेकॉर्ड बुकमध्ये होणा

कल्याण : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र आजच्या तरुण पिढीला कळावे. त्यांच्यासमोर आदर्श निर्माण व्हावा यासाठी कल्याण पूर्वमधील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कल्याण पूर्वमध्ये ‘श्री शिव संस्कार महोत्सव २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून या महोत्सवाला सुरुवात झाली असून, रविवारी १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रेरणा यात्रेने समारोप होणार आहे. मंडळाचे हे ३७ वे वर्ष आहे.  

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी अनोखा उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमात कल्याण पूर्वमधील तिसाई देवी मंदिर परिसरामधील मैदानात चार फूट बाय ४० फूट या आकाराची जय शिवराय या शब्दाच्या आकाराची पुस्तक मांडणी तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीत सुमारे ३ हजारहून अधिक पुस्तकांची मांडणी करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त पुस्तके आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपक्रमानंतर जमा झालेली शालेयपयोगी पुस्तके ही गरजू शाळांना मोफत देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमाची नोंद इंडिया बुक रेकॉड्स आणि अनेक रेकॉर्ड बुकमध्ये होणार आहे.

नागरीकांच्या सहभागाने या पुस्तकांचे संकलन कमीत कमी वेळेत होणे आवश्यक असल्याने जास्तीत जास्त नागरीकांनी कीमान एक तरी पुस्तक या संकल्पनेसाठी दान देण्याचे आवाहन समितीच्या वतीने अध्यक्ष रुपेश गायकवाड, सचिव राजू अंकुश तसेच नरेंद्र सुर्यवंशी यांनी केले आहे. तर भक्ती शक्ती या संकल्पनेवर आधारित महाराजांची भव्य शिव प्रेरणा यात्रा १९ फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता दादासाहेब गायकवाड क्रीडांगण कोळसेवाडी येथून सुरू होणार या प्रेरणा मिरवणूकीत विविध संस्था संघटनांचा सहभाग लाभणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यावेळी अध्यक्ष रुपेश गायकवाड, सचिव राजु अंकुश, संख्यापक अध्यक्ष भगवान भोईर, विश्वस्त नरेद्र सुर्यवंशी, विष्णु जाधव, अनिल घुमरे, खजिनदार रवि हराळे, रागेश पिल्ले, जरीमरी सेवा मंडळ अध्यक्ष दत्ता गायकवाड, पंचकमिटी अध्यक्ष सुनिल गायकवाड, वंदना मोरे, अर्चना सुर्यवंशी, यशोदा माठी, सविता देशमुख, मिनाक्षी अहिरे आदींसह सर्व महिला व पुरुष कार्यकर्त उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत