डोंबिवलीतील कर्ण बधीर मुलांनी दहीहंडी फोडत केला आनंद साजरा

Views: 384
शेअर करा:

डोंबिवली : दोन वर्षानंतर होणाऱ्या दहीहंडी उत्सवाचा कल्याण डोंबिवलीत चांगलाच उत्साह दिसत आहे. अनेक राजकारणी आणि नामांकित संस्थांतर्फे कल्याण डोंबिवलीत दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला असला तरी डोंबिवलीतील दिपेश म्हात्रे फाऊंडेशनची कर्णबधीर मुलांसाठी आयोजित दहीहंडीने सर्वांची मने जिंकली.

कोरोनामुळे गेली २ वर्षे दहीहंडीचा उत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा होताना दिसत आहे. डोंबिवली पश्चिमेला दिपेश म्हात्रे फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक संदेश देणारी दहिहंडी सम्राट चौकात साजरी करण्यात आली.

डोंबिवलीतील ठाकूरवाडी येथील संवाद कर्णबधीर शाळेतील विद्यार्थ्यांनी जल्लोषात ही हंडी फोडून उत्सवाची सुरुवात केली. एकीकडे रिमझिम पावसाची बरसात तर दुसरीकडे दहीहंडी फोडण्याचा या कर्ण बधीर मुलांच्या चेहऱ्यावरील निस्सीम आनंद असा दुग्धशर्करा योग यावेळी जुळून आला होता.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत