मांडूळ सापाची विक्री करणाऱ्या ५ जणांना खडकपाडा पोलिसांनी केली अटक

Views: 401
शेअर करा:

कल्याण  : काळया जादूसाठी मांडूळाची विक्री करण्यासाठी आलेल्या ५  जणांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली असून या मांडूळची किंमत अंदाजे ७० लाख रुपये असल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने – पाटील यांनी दिली. 

खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुर्मिळ प्रजातीचा हा साप विक्रीसाठी काही लोकं येणार असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून निलेश हिलिम (व्यवसाय मजुरी आणि राहणार पालघर), चेतन कांबळे (भिवंडी), अरविंद पंडीत (टिटवाळा), विशाल ठाकरे (पालघर) आणि अनिल काटेला (पालघर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मांडुळ ही सर्प प्रजातीतील एक दुर्मिळ प्रजाती आहे. त्याचा वापर आयुर्वेदीक औषधासह काळया जादुसाठीही केला जात असल्याचा समज आहे. पोलिसांनी या पाच आरोपींकडून तब्बल २  किलो ६०० ग्रॅम वजनाचा आणि ४४ इंच लांबीचा मांडूळ हस्तगत केला आहे. सध्या या मांडूळाला वन विभाग आणि मानद वन्यजीव संरक्षक यांच्याकडे देण्यात आले असून लवकरच त्याची जंगलात सुटका केली जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी सांगितले. 

ही कारवाई कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या निर्देशानुसार खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार केंचे, शरद झिने, पोलीस हवालदार पाटील, शेले, देवरे, कॉन्स्टेबल भालेराव, बोडके आणि तागडनेम यांच्या पथकाने केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत