मशिदीवरील भोंगे प्रकरण : मनसेच्या प्रदेश सचिवाची सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी

Views: 547
शेअर करा:

येत्या दोन दिवसात मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार… 

कल्याण : कल्याण डोंबीवली शहरातील मुस्लिम बांधवानी  मनसेचे आमदारासह नगरसेवकांना राज ठाकरेंवर विश्वास ठेवून भरभरून मतदान केले. यामुळे २००९ साली कल्याण पश्चिम विधानसभेत मनसेचा आमदार निवडून आला. तर कल्याण ग्रामीण मधून सध्याचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही ७ हजार मुस्लिम मतदारांनी मतदान केल्याने ते निवडून आले. असे असताना मशिदीवरील भोंगे उतरविण्याबाबत राज ठाकरेंनी गुडीपाडव्याला जे भाषणांतून व्यक्तव्य केले. त्याबाबत आता मुस्लिम मतदार आम्हाला जाब विचारात असल्याची प्रतिक्रिया मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून नाराजी व्यक्त केली आहे. 

इरफान शेख मनसेच्या स्थापनेपासूनच कट्टर राज समर्थक मानले जातात. मनसेच्या सुरुवातीला आक्रमक भूमिका घेऊन नागरिकांच्या समस्या घेऊन अनेक अंदोलन, मोर्चे, धरणे केल्याने त्यांच्यावर राजकीय गुन्हे दाखल होऊन जेलमध्येही जावे लागले. आता मात्र मशिदीवरील भोंगेच्या वक्तव्यावरून  जो वाद निर्माण झाला. याची सर्वाधिक खंत राज ठाकरेंना  मानणाऱ्या  मुस्लिम वर्गाला वाटली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावरून मुस्लिम समाजात नाराजी  पसरली असून आता मनसेला  मतदान करणारा मुस्लिम मतदार आमच्या सारख्या मनसे पदाधीकाऱ्याना जाब विचारत आहेत. 

यामुळे येत्या दोन दिवसात मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी सोशल मीडियावर मत व्यक्त करत नाराजी व्यक्त केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत