मुंबईच्या १६ वर्षीय गौरांग बागवेने केला ग्रँडमास्टर लक्ष्मण आर.आर. चा पराभव

Views: 642
शेअर करा:

कल्याणमध्ये पार पडली पहिली आमदार चषक बुद्धिबळ स्पर्धा  

कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर व  कल्याण तालुका बुध्दीबळ संस्थेद्वारा आयोजित “पहिला आमदार चषक “अखिल भारतीय खुले जलद नामांकन बुध्दीबळ स्पर्धा – २०२३ कल्याण पश्चिम येथील नटरंग हॉल,बैलबाजार येथे संपन्न झाली. या स्पर्धेत मुंबईच्या १६ वर्षीय गौरांग बागवेने ग्रँडमास्टर लक्ष्मण आर. आर. चा पराभव केला. “पहिला आमदार चषक”अखिल भारतीय बुध्दीबळ स्पर्धे मध्ये महाराष्ट्रसह १७  राज्यातील ६१३ खेळाडूंनी भाग घेतला.

या आमदार चषक स्पर्धाचा बक्षीस समारंभ आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला. स्पर्धेतील प्रथम विजेता गौरांग बागवे (मुंबई) याला होंडा एक्टिवा व ट्रॉफी, द्वितीय विजेता ग्रँडमास्टर लक्ष्मण आर. आर. (चेन्नई) यांना २० हजारांचे रोख बक्षीस व व ट्रॉफी, तृतीय विजेता मंदार लाड (पुणे) यास १५ हजार रोख बक्षीस व ट्रॉफी तसेच विविध गटातील विजयी स्पर्धकांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख रवि पाटील, कल्याण तालुका बुध्दीबळ संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय पाटील, विधानसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर, जयवंत भोईर, मोहन उगले, शिवसेना उपशहर प्रमुख सुनील खारूक, शिवसेना विभाग प्रमुख रामदास कारभारी, डॉ. धीरज पाटील, शाखा प्रमुख गणेश कोटे, कल्याण तालुका बुध्दीबळ संस्थेचे मोहित लढे, संघर्ष सोमण, डॉ. दीपक तांडेल यांच्यासह राज्यभरातून आलेले खेळाडू व त्याचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत