मेट्रोच्या कामामुळे आधीच हैराण; पाईपलाईन फुटल्याने मनस्तापात भर

Views: 562
शेअर करा:

कल्याण शिळ रोडवर मेट्रोच्या कामादरम्यान पाण्याची पाईप फुटली

लाखो लिटर पाणी गेले वाया

कल्याण : आज दुपारी कल्याण शीळ रोडवरील काटई नाक्याजवळ एमआयडीसीची पाण्याची मोठी पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. मेट्रो कामामुळे मागील दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. मेट्रोच्या कामामुळे दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता ह्या फुटलेल्या पाण्याच्या पाईपलाईनमुळे मनस्तापाला सामोरे जाव लागला आहे.

दीड – दोन वर्षभरापासून सुरु असलेल्या मेट्रोच्या कामामुळे कल्याण शीळ रोडवरील ट्रॅफिक समस्या दिवसागणिक वाढत चालली आहे. असे असताना कामा दरम्यान पाण्याची पाईप लाईन फुटल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडत आहे. दुपारी पावणे ४ ते ४ च्या दरम्यान पाण्याची पाईप लाईन फुटली असून ती अर्धा ते पाऊण तासाने बंद करण्यात आली. तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले. डोंबिवली एमआयडीसी आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील पाणी पुरवठा करणारी ही पाईपलाईन फुटल्याने या भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

लोकांना नको असलेली व पुढे भविष्यात उपयोगी न पडणारी ही मेट्रो अजून पूर्ण होयला कमीतकमी पाच वर्ष लागणार हे नक्की. तो पर्यंत या मेट्रोचा फटका जनतेला बसणारच. याचा किती मस्ताप नागरिकांनी सहन करायचा असा सवाल जागरूक नागरिक राजू नलावडे यांनी उपस्तीत केला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत