हातात काम नव्हे, हातात वही- पेन हवी युवा संस्कारची भूमिका

Views: 245
शेअर करा:
  : बालदिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम होत असताना, वास्तव मात्र वेगळे चित्र दाखवते. आपल्या समाजात अजूनही मुलं बालमजुरी करताना, बालविवाहाच्या विळख्यात सापडताना आणि शाळेबाह्य मुलांची संख्या वाढताना दिसतात. हेच मुलं आपलं उद्याचं भविष्य आहेत, आणि त्यांचं बालपण सुरक्षित करणं ही सामूहिक जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था सतत मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे. 2009 पासून संस्था वंचित व आदिवासी पाड्यांतील मुलांना शैक्षणिक मदत पुरवत आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते रोजगारापर्यंत मुलांच्या शिकण्याच्या प्रवासात सातत्यपूर्ण साथ देण्याचे काम युवा संस्कार करत आहे.
2016 मध्ये संस्थेची अधिकृत नोंदणी झाल्यानंतर शिक्षण आनंददायी, मुक्त आणि मुलांच्या उपजत क्षमतेला जागवणारं बनवण्यावर विशेष भर देण्यात आला. संस्थेचे तत्त्व एकच हातात काम नको, हातात वही- पेन हवी.
युवा संस्कारचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना उज्ज्वल भविष्याकडे नेणाऱ्या शैक्षणिक प्रवासात भक्कम पायाभरणी करणे. बालदिनानिमित्त, युवा संस्कारचे आवाहन प्रत्येक मूल शाळेत जावं, शिकावं आणि बालपण पुन्हा उजळून निघावं हेच आहे.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत