संत निरंकारी मिशनच्या मोफत दंत चिकित्सा शिबिरात १०४ बालके लाभान्वित

Views: 401
शेअर करा:

ठाणे : आपले दात व हिरड्यांची योग्य निगा कशी राखावी याबाबत लहान मुलांना मार्गदर्शन करत, ठाण्यात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित बालकांसाठी दंत चिकित्सा शिबिरामध्ये 104 मुलांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. या शिबिराचे आयोजन संत निरंकारी सत्संग भवन, गणेशवाडी, ठाणे येथे करण्यात आले.

सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य शिकवणीनुसार संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने मुंबई व ठाणेसह राज्यातील विविध ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून भव्य रक्तदान शिबिरांची शृंखला सुरू आहे. त्याचबरोबर मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व कर्करोग तपासणी या शिबिरांचे देखील अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. वीणा भगत, डॉ.स्वप्नाली गायकवाड व डॉ.मनाली जाधव यांच्याकडून उपस्थित लहान मुलांची सखोल दंत तपासणी करण्यात आली. तसेच लहान मुलांच्या दात व हिरड्या संबंधी समस्या जाणून घेत त्यांना आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी मार्गदर्शन देखील करण्यात आले.

शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व लहान मुलांना किटचे वाटप करण्यात आले ज्यात दातांची निगा राखण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचा समावेश होता. शिबिराचा शुभारंभ सेवादल क्षेत्रीय संचालक अमोल सुर्वे यांच्याहस्ते निरंकार ईश्वराच्या सामूहिक नामस्मरणाने करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे ठाणे सेक्टर संयोजक डॉ.आर.एस.यादव यांच्यासह अनेक सेवादल अधिकारी, प्रबंधक व सेवादल स्वयंसेवक उपस्थित होते. मंडळाचे स्थानिक ब्रँचचे प्रबंधक, सेवादल अधिकारी व सर्व सेवादल स्वयंसेवकांच्या एकत्रित प्रयत्नाने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत