Views: 569
कल्याण : कल्याण शिळ रोडवर आज नव्याने सुरु झालेल्या शिव शिल्पिका पेट्रोलियमच्या उद्घाटना निमित्त १ रुपयांत एक लिटर पेट्रोल देण्यात आले. हे एक रुपयांत पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे पहायला मिळाले. मनीष मिश्रा आणि आनंद दुबे कुटुंबीयाच्या वतीने आज शिव शिल्पिका पेट्रोलियमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एचपीसीएल रिटेलचे उप व्यवस्थापक पावस श्रीवास्तव, एसीपी अमित कुराडे, एचपीसीएल विक्री व्यवस्थापक अमित शर्मा आदींसह सर्वच क्षेत्रातील इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
पलावा शहराच्या सर्वात जवळ हा पंप असून जो १० हजार हून अधिक कुटुंबांना सेवा पुरविणार आहे. उद्घाटन प्रसंगी प्रसंगी ते पहिल्या ५०० दुचाकीस्वारांना १ रुपयाचे पेट्रोल वितरीत करण्यात आले. या ५०० दुचाकीस्वारांना पेट्रोल मॅनलिटिक्स बीटूबी आयटीईएस प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने प्रायोजित केले होते. सध्याच्या महागाईच्या काळात शंभरी पार केलेल्या पेट्रोलमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत सर्व सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळावा यासाठी शिव शिल्पिका पेट्रोलियमच्यावतीने उद्घाटनाचे औचित्य साधून एक लिटर पेट्रोल अवघ्या एक रुपयांत देण्यात आले असल्याची माहिती मनिष मिश्रा यांनी दिली.
त्याचप्रमाणे मॅनलिटिक्स बीटूबी आयटीईएस प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका शिल्पिका मिश्रा यांच्या वाढदिवसानिमित्त पलावा येथे मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सनसिटीचे चेतन तायशेटे, लोढा गोल्फलिंक सोशल कॉज ग्रुप आणि गोल्फलिंक वॉकर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शिल्पीका यांचे पती मनीष मिश्रा आणि मेहुणे आनंद दुबे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजित केले. तर या कुटुंबाने नोव्हेंबरमध्ये आनंद दुबे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून, अनाथाश्रमाला भेट देऊन आणि अनाथाश्रमातील मुलांना मदत करून साजरा केला.



