Views: 615
कल्याण शहर ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कल्याण : आजचे विद्यार्थी हे आपल्या देशाचे उद्याचे भविष्य असून विद्यार्थ्यांनी चांगलं शिकून आपल्या देशाचे नाव उज्वल करावे असे मत कल्याण शहर ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राकेश मुथा यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कल्याण शहर ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते.
कल्याण शहर ज्वेलर्स असोसिएशन यांच्यातर्फे उत्कृष्ट गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कल्याण पश्चिमेतील एका सभागृहात आयोजित करण्यात आला. यामध्ये सीए, एमबीए, एचएससी,एसएससी, वकील, डॉक्टर या परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी विद्यार्थ्यांना तज्ञानी मार्गदर्शन देखील केले. आज या संस्थेने आम्हाला गौरविले हि आनंदाची बाब असुन यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. अशाच प्रकारे दर वर्षी इतरही विद्यार्थ्यांचे यामुळे मनोबल वाढणार असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
यावेळी कल्याण शहर ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राकेश मुथा, उपाध्यक्ष पराग जैन, नितीन जैन, सचिन घोडके, सचिव मदन शंकलेशा, सहसचिव सुनेख जैन, खजिनदार रवि जैन, भूषण शहा, सदस्य महेंद्र शंकलेशा, गौतम शंकलेशा, जयंती रावल, अजित संघवी, नरेश शंकलेशा, किशोर शंकलेशा, नरपत शंकलेशा, शैलेश शहा, प्रकाश शंकलेशा, प्रदीप मुथा, कमलेश जैन, नवीन जैन, दिपू वर्मा आदी पदाधिकारी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



