केडीएमसी निवडणुकीत टिटवाळ्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार – आमदार डॉ. किरण लहामटे

Views: 614
शेअर करा:

कल्याण : आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत टिटवाळ्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याचा विश्वास अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यत केला आहे. टिटवाळा येथे राष्ट्रवादीचे वार्ड अध्यक्ष मोरेश्वर तरे यांच्यवतीने विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा गुण गौरव, मोफत छत्री वाटप आणि जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला अकोल्याचे आमदार डॉ. किरण लाहमटे हे प्रमुख उपस्थित होते यावेळी ते बोलत होते.

      राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, मांडा टिटवाळा शहर प्रभाग क्र. ६ वार्ड क्र. ८, ९, १० च्या वतीने मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन इंदिरा नगर रोड टिटवाळा पूर्व येथे करण्यात आले. तर संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त टिटवाळा पूर्वेतील प्रथमेश हॉल याठिकाणी १० वी, १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे जेष्ठ व गरजू नागरिकांना छत्री वाटप देखील करण्यात आले. यावेळी अकोले विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई, कार्याध्यक्ष उदय जाधव यांच्यासह इतर अनेक मान्यवर, विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      यावेळी बोलताना आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सांगितलं कि, महाराष्ट्रात राजकारणात उलथापालथ होत असताना टिटवाळा शहरात राष्ट्रवादी पक्ष उभारी घेत आहे. याठिकाणी अकोले परिसरातील सुमारे २० ते २५ हजार लोकं राहतात. शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. शहरात विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळत आहे. त्यासाठी पालक खूप मेहनत घेत आहेत. कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयातून नागरिकांना न्याय दिला पाहिजे.  विद्यार्थ्यांना करियर बाबत मार्गदर्शन केले पाहिजे. मोरेश्वर तरे यांना काम करण्याची संधी देऊन निवडणुकीत निवडून देत नगरसेवक करा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

       राष्ट्रवादीचे वार्ड क्र. १० अध्यक्ष मोरेश्वर तरे, वार्ड क्र. ८ अध्यक्ष महेश भोय, प्रभाग क्र. ६ अध्यक्ष सुहास कांबळे, कल्पेश नांगरे आदींसह इतर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत