Views: 517
कल्याण : कंटेंट क्रिएटर, यूट्यूबर, फूड ब्लॉगर ‘चिकन लेग पीस’ हे लोकप्रिय यूट्यूब चॅनेल चलवणारे उल्हास कामठे यांचा वाढदिवस होपमिरर फाउंडेशनच्या सहकार्याने खारघर येथे गरजू मुलांसोबत २०० मुलांना अन्न वाटप करून सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्यात आला.
उल्हास कामठे यांचे खाण्याचे व्हिडिओ लोकप्रिय ठरले आहेत. उल्हास कामठे यांच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये चिकन लेग पीस असतो. त्यांच्या या हटके अंदाजामुळे त्यांचे जगभरात चाहते आहेत. ट्विटरपासून ते युट्यूबपर्यंत त्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांचा वाढदिवसानिमित्त मुलांना त्यांच्या सोबत सवांद साधता आला. यावेळी होपमिरर फाउंडेशन संस्थेचे रमजान शेख यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. गरजू मुलांना अन्न वाटप केल्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.



