Views: 650
कल्याण : कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे येथे केडीएमसीचा कचऱ्यापासून खत निर्मिती सुरु असलेल्या प्रकल्पाला शनिवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमनदल घटनास्थळी पोहोचत आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले. लागलेली आग मोठी असल्याने दुपारी आदीच्या सुमारास लागलेली आग संध्याकाळी सहा वाजता विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथे कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प आहे. याठिकाणी शनिवारी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केलं. आगीमुळे धुरीचे लोट उठल्याने ते आजूबाजूच्या परिसरात पसरले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले मात्र हवा असल्याने आग विझवण्यात अडथळे येत होते. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन विभागाला यश आले. लागलेली आग जास्त असल्याने आगीवर नियंत्र आणण्यासाठी अग्निशमनच्या ७ गाड्या मागवण्यात आल्या असल्याचे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले.



