राष्ट्रीय महापुरुषांच्या फोटो विना राज्यात कोणताच कार्यक्रम होऊ शकत नाही – अँड. वैशाली डोळस

Views: 681
शेअर करा:

कल्याण : राष्ट्रीय महापुरुषांच्या फोटो विना राज्यात कोणताच कार्यक्रम होऊ शकत नाही असे मत  अँड. वैशाली डोळस यांनी व्यक्त केले. कल्याण डोंबिवली महापालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था कल्याण यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रीय महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या.

या संयुक्त जयंती महोत्सवाचे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रल्हाद रोडे, उप आयुक्त अवधूत तावडे आणि उप आयुक्त प्रसाद बोरकर, डॉ. दिपा शुक्ला, माजी महापौर रमेश जाधव यांच्या हस्ते सकाळी उद्घाटन झाले. सकाळच्या सत्रामध्ये आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप, कॅल्शियम तपासणी, मधुमेह तपासणी आणि जनरल तपासणी त्याच बरोबर मोफत औषध वाटप रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी संस्थेच्या वतीने ग्रुप इन्शुरन्स द्वारे महापालिका कर्मचारी यांचे कुटुंबीय मंजुळा कामडी आणि सोनी आठवाल यांना दोन लाखाचा चेक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 दुसऱ्या सत्रात आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण पश्चिम या ठिकाणी देशभक्ती पर व महापुरुषांच्या जीवन कार्यावर समुह नृत्य स्पर्धा घेण्यात आली असून त्याचे उदघाटन अभिनेत्री सविता हांडे यांच्या हस्ते झाले. तसेच महापुरुषांच्या जीवन कार्यावर प्रमुख व्याख्यात्या वैशाली डोळस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विचार मंचावर उपस्थित अतिरिक्त आयुक्त धैर्यशील जाधव, उपायुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त निलम कदम, तसेच संस्थाध्यक्ष चंद्रकांत पोळ, जयंती समिती अध्यक्ष कल्पना खरात उपस्थित होत्या.

 यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज दत्तक योजना अंतर्गत १५ गरीब व गरजू  मुलांची वार्षिक जबाबदारी संस्थेने घेतली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष चंद्रकांत पोळ, सरचिटणीस विजय सरकटे, जयंती समिती अध्यक्ष कल्पना खरात, सचिव सुवर्णा गायकवाड, कोषाध्यक्ष संजीवनी पाटकर, पौर्णिमा कांबळे, युगा नलावडे, अनघा पवार, सीमा आठवले, संजय ओंकारेश्वर, प्रवीण कांबळे, अनिता शिंदे, राहुल पवार, समाधान मोरे, भूषण कोकणे, श्रीकांत वाघमारे, नागेश टोळ, संतोष हेरोडे, नवनीत गायकवाड, सुनील अंबाडे, भाऊराव पंडित, सुनील चाटे, संदीप गिरी, युवराज गाडे, उत्तम साबळे, रमेश चौरे आदींनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष हेरोडे यांनी केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत