कै.गजानन हिरू पाटील विद्यामंदिरात विज्ञान प्रर्दशनात विद्यार्थ्यांनी दाखवली कल्पकता

Views: 409
शेअर करा:

                                कल्याण : प्लानेट जीएचपी अंतर्गत कै.गजानन हिरु पाटील विद्यामंदिर, मातोश्री शेवंताबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालय त्याचप्रमाणे कै. गजानन हिरु पाटील इंग्लिश स्कूल, अटाळी या शाळांच्या वतीने शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन नुकतेच मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आलेले होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,गणित, पर्यावरण, तंत्रज्ञान, AI चा वापर,रोबोटिक्स अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी १२५ प्रयोगांची मांडणी केलेली होती.

कार्यक्रमाचे उद्घाघाटन नारायण गजानन पाटील संस्था अध्यक्ष  गणेश पाटील, मुख्याध्यापक व सचिव शशिकांत पाटील, भानुदास मडके, अनिल पाटील, अजित कांबळे, अर्जुन उगलमुगले, जगे, सोनवणे, प्रशांत भामरे  यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी स्थानिक समाजसेवक दशरथ तरे, वासुदेव पाटील, जयराम तरे विशाल पाटील, हर्षाली थवील, अरुण भोईर, अनिल पाटील, शक्तिवान भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारीवुंद यांनी विशेष मेहनत घेतली. त्याचबरोबर शिक्षकांनी शाळेच्या आवारात बागकाम व पाण्यावरील शेती या विषयावर विशेष काम केले. बुवाबाजी, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी या प्रसंगी विघार्थीनी पथनाट्य सादर करीत जनजागृती केली. रडारच्या माध्यमातून  संदर्भीत परिक्षेत्रात घडामोडी वर कसा प्रकाशझोत टाकला जातो ह्या विज्ञाननिष्ठ विघार्थीनी सादरीकरण केलेला प्रयोग सर्वाचा आकर्षणाचा विषय याप्रसंगी बनला होता.

“विज्ञानावर आधारित कल्पकता आणि विद्यार्थ्यांच्या बैध्दिक कुशलता आणि कसब या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हे विज्ञान प्रदर्शन शाळेत दरवर्षी आयोजन केले जात असल्याचे मुख्याध्यापक गणेश पाटील यांनी सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत