Views: 383
कल्याण : पाठीवर ‘स्टार’ असलेले कासव घरी ठेवणे भाग्यशाली समजले जाते. अशाच समजापोटी स्टार कासवांची अवैध विक्री वाढली आहे. वन्यजीव कायद्याप्रमाणे हे कासव दुर्मिळ प्राण्यांच्या वर्गात मोडतात आणि त्यांची विक्री किंवा जवळ बाळगणे हा गुन्हा आहे. अशाच एकाका कासवाची मंगळवारी डोंबिवली येथून भर रस्त्यातून प्राणी मित्र भूषण पवार आणि तुषार चव्हाण यांनी सुटका केली.
तुषार चव्हाण यांना डोंबिवली येथील एकता नगर परिसरात हे कासव वावरतांना आढळून आले. इतर कासवांपेक्षा हे कासव थोडे वेगळे असल्यांने त्यांनी पॉज संस्थेचे प्राणी मित्र भूषण पवार यांना त्वरित त्याची छायाचित्रे पाठवली. संरक्षित प्रजाती मध्ये मोडत असल्याने भूषण पवार यांनी त्वरित हे कासव रेस्क्यू करून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.
धनलाभ अश्या अंधश्रद्धेपोटी लोक ही कासवे पाळत असतात पण संबंधित प्रजाती ही संरक्षित जातीत मोडत असल्याचे कळताच त्यांना सोडून देण्यात येते. काळ्या बाजारात ह्या कासवांची किंमत ही लाखो रुपये असल्याचे भूषण पवार यांनी सांगितले.



