Views: 380
कल्याण : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनी सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी महापालिका मुख्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांचेसह मुख्य लेखा अधिकारी, महापालिका सचिव, महापालिकेचे सर्व उपायुक्त, कार्यकारी अभियंता व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
तसेच कल्याण पश्चिमेतील लाल चौकी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, महापालिका सचिव संजय जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व इतर कर्मचारी तसेच समाजबांधव उपस्थित होते.



